in

‘सोशल मीडियावर मदत मागणारे, टीका करणाऱ्यांवर कारवाई केल्यास खबरदार’

सोशल मीडियावर मदतीबाबत पोस्ट करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, असा इशारा देतानाच सरकारविरोधात अफवा पसरविण्याच्या नावाखाली नागरिकांवर कारवाई केल्यास न्यायालयाच्या आदेशाची अवमानना मानली जाईल, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दिली आहे. , याप्रकरणी पुढील सुनावणी १० मे रोजी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देशातील कोरोना स्थितीबाबत दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली. सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड, औषधी इत्यादींची मदत मागणारे किंवा केंद्र तसेच राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांवर अफवा पसरविण्याच्या नावाखाली गप्प करण्याच्या कृतीवरून न्यायालयाने सरकारला तंबी दिली आहे.

नागरिकांचा आवाज आपण ऐकायला हवा. अशा लोकांवर कारवाई केल्यास न्यायालयाची अवमानना मानली जाईल, अशा इशारा न्यायालयाने केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकार तसेच पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PBKS Vs RCB: पंजाबनं ३४ धावांनी सामना जिंकला

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण