in

भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

नवी दिल्ली | भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांच्या न्यायालयीन लढाईला मोठं यश आलंय. सर्वोच्च न्यायालयाने 39 महिला अधिकाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. यानंतर या 39 महिला अधिकाऱ्यांना भारतीय सैन्यात समाविष्ट करण्यात आलं आहे.

भारतीय सैन्यात महिलांना सध्या अल्प काळासाठीच सेवेत दाखल करुन घेण्यात येत होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने महिलांना देखील भारतीय सैन्यात कायम सेवेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय दिला.त्यामुळे महिला अधिकाऱ्यांना कायम सेवेनुसार निवृत्त होईपर्यंत काम करता येणार आहे. शॉर्ट सर्विस कमिशनमध्ये महिलांना केवळ 10 वर्षांसाठी सेवेत राहता येतं. त्यानंतर त्यांना काम सोडण्याचा किंवा कायम सेवेत दाखल होण्याचा पर्याय होता. ज्यांना कायम सेवेत घेतलं नाही त्यांना फारतर 4 वर्षांसाठी मुदतवाढ मिळत होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दीड वर्षांनी सुरु झालेल्या नाट्यगृह आणि सिनेमागृहाकडे प्रेक्षकांची पाठ

शिवशाही की निजामशाही? चित्रा वाघ यांनी ‘कू’वर सरकारला विचारला जाब