in

नागपूर खंडपीठाच्या बलात्कार प्रकरणावरील ‘त्या’ निर्णयावर ‘सर्वोच्च’ सुनावणी

लोकशाही न्यूज नेटवर्क | शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल आणि केवळ मुलीच्या स्तनांना हात लावला म्हणून पोक्सो कायद्यातंर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने दिला होता. या वादग्रस्त निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होता. आज या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

प्रत्यक्ष त्वचेशी संपर्क नसल्याने केवळ मुलीच्या स्तनांना हात लावला म्हणून पोक्सो कायद्यातंर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने देत आरोपीला जामीन मंजुर केला होता.

या निर्णयाला राष्ट्रीय महिला आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठाने निर्णयाला स्थगिती दिली.

दरम्यान आता नागपूर खंडपीठाच्या बलात्कार प्रकरणावरील वादग्रस्त निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

प्रकरण काय ?

2016 मध्ये सतीश नावाच्या एका 39 वर्षीय आरोपीने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पीडित मुलीची साक्ष नोंदवून पोक्सो कायद्यातंर्गत आरोपी सतीशला सत्र न्यायालयाने 3 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाला नागपूर खंठपीठात आव्हान देण्यात आले होते. त्यावर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता. त्याला आज सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सही घेण्यासाठी ‘ते’ मातोश्रीवर… राणे आणि राऊत आमने-सामने

उत्तराखंड दुर्घटना : ३२ मृतदेह आढळले, अनेक जण अद्यापही बेपत्ता