in

शरद पवारांनी यू-टर्न घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगताच, सुप्रिया सुळेंनी दिली जंत्री

लोकशाही न्यूज नेटवर्क

नव्या कृषी कायद्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. पण नंतर त्यांनी यू-टर्न घेतला असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. यावरूनच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पलटवार करताना मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या यू-टर्नची जंत्रीच दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटी करप्रणालीला विरोध केला होता. आम्ही म्हणजे यूपीआयने आरटीआय, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षणाचा हक्क, नरेगा, नवीन कॉर्पोरेट कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आणला होता. विकासाच्या कोणत्याही कायद्याला यूपीएने एकतर्फी न आणता सर्वांशी चर्चा करुन विकासाचे कायदे आणले. भाजपने सुरुवातील या कायद्यांना विरोध करून सत्तेत आल्यानंतर याच कायद्यांचे समर्थन केले.

नरेगाचा विरोध भाजपने सातत्याने केला. मात्र याच नरेगामुळे कोविड काळात अनेकांना रोजगार मिळाला, हे विसरता येणार नाही. आधार कार्डला देखील भाजपाने टोकाचा विरोध केला. मात्र आज आधारला पुढे घेऊन जाण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. मोदी सरकारचा हा लेफ्ट टर्न, राइट टर्न आहे की यू-टर्न हे मला माहीत नाही. पण पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीने आमच्या भूमिकेवर यू-टर्न सारखी शेरेबाजी करणे योग्य नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवार कृषीमंत्री असताना आंदोलने का झाली नाहीत? सुप्रिया सुळेंच्या मोदी सरकारला कानपिचक्या

मोदींनी वाचलेल्या पत्राचा ‘हा’ आहे दुसरा भाग, सुप्रिया सुळेंनी केला खुलासा