in

सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या ‘त्या’ पावसातल्या सभेचा सांगितला किस्सा…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पावसातली सभा आठवली तर, तब्बल 80 व्या वर्षात भिजलेल्या अवस्थेत ते उभे असलेले चित्र आपसूकच डोळ्यासमोर येते. याच राज्याच्या राजकारणात गाजलेल्या ऐतिहासिक सभेतला एक किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबईतल्या कार्यकर्त्या मेळाव्यात सांगितले.

शरद पवार यांच्या पावसातील सभेनंतर राज्यातील लाखो लोकांनी त्यांचा तो फोटो आपल्या स्टेटसला ठेवला होता. हा फोटो नेमका कुणी काढला ? आणि त्या दिवशी तो एकटाच का कॅमेरामन होता आणि दीड लाख रुपये भरुन देण्याबाबत कशी विचारणा केली हेही सांगितलं.

शरद पवारांच्या साताऱ्यातील पावसातल्या सभेत माध्यमांचा एकही माणूस नव्हता. पाऊस झाल्याने सभा होणार नाही, रद्द होईल असा विचार करुन सर्व पत्रकार निघून गेले होते. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा मीडिया सेलचा माणूस तेथे होता. त्याने शशिकांत शिंदेंना फोन केला सभा होणार आहे की नाही. त्यावर शशिकांत शिंदेंनी सभा होणार आहे असं सांगितलं. तो म्हणाला माझा कॅमेरा दीड लाख रुपयांचा आहे. पावसात माझा कॅमेरा खराब झाला तर तुम्हाला द्यावा लागेल असं तो कॅमेरावाला म्हणाला. शशिकांत शिंदेंनी कॅमेरा भरुन देण्याचं आश्वासन देत शुटिंग करायला सांगितली.“तो कॅमेरामन दीड लाख रुपयांचा कॅमेरा पावसात घेऊन काळजीने बसला आणि राजकीय वर्तुळातला टर्निंग पॉईंट ठरणारा फोटो त्याने टिपला. नियतीच्या मनात काय असतं ते कुणालाही माहिती नसतं. त्यामुळे एखाद्या चांगल्या कारणासाठी तुम्ही लढला तर त्याचा परिणाम चांगला होता,” असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”सभेनंतर शशिकांत शिंदे यांचा फोन आला. त्यांनी ताई मी सॉरी म्हणायला फोन केलाय असं सांगितलं. मला काळजी वाटली, कशाबद्दल सॉरी हे कळालं नाही. मी काय झालंय हे विचारलं. ते म्हणाले आम्ही सभा केली आणि साहेब त्यात पूर्ण भिजले. मी कपाळाला हात लावला. मी कपाळाला हात लावून त्यांना सांगितलं माझे वडील 80 वर्षांचे आहेत, पायाला जखम झालीय. मी आणि शरद साहेबांनी ठरवलं लढेंगे तो पुरी ताकदसे लढेंगे, नही तो नही.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाच रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील, मुंबई महापालिकेचा निर्णय

लसीकरणानंतरही मुंबई आणि नागपूरमध्ये सात आरोग्यसेवक कोरोना पॉझिटिव्ह!