in

Sushant Singh Rajput Case| सिद्धार्थ पिठानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणात आरोपी सिद्धार्थ पिठानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सिद्धार्थ पिठानीला 27 मे रोजी हैदराबादेतून अटक करण्यात आलं होतं. त्याला आज कोर्टात हजर केलं असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर केलं असता 31 मे पर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा कोर्टात हजर केलं असता 4 जूनपर्यंत एनसीबी कोठडी वाढवण्यात आली होती. दरम्यान सिद्धार्थ पिठानीने आपल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती एनसीबीतील सूत्रांनी दिली आहे.

27 मे रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करत सुशांतचा रुममेट आणि महत्त्वाचा संशयित सिद्धार्थ पिठाणी याला अटक केले . एनसीबी पथकाचे नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी हा एक महत्त्वाचा संशयित होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसई-विरारकरांना दिलासा; मोबाइल व्हॅन लसीकरणाने घेतली गती

Petrol diesel rate | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ