in

सुव्रत- सखीच्या आयुष्यात तिसऱ्याचं आगमन … शेअर केली आनंदाची बातमी

कलाक्षेत्रामध्ये सध्या आनंद वार्ता ऐकायला मिळत आहे. अशीच एक आनंदाची बातमी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी हिच्याकडे आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हे कपल अगदी मेड फॉर इच अदर मानलं जात. सखी आणि सुव्रत यांनी ११ एप्रिल २०१९ रोजी लग्नगाठ बांधली होती. आता या दोघांच्या आयुष्यात एक नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. हा पाहुणा म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून सुव्रत आणि सखीची नवीन गाडी आहे. सुव्रतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या बाबत माहिती दिली. आम्हा दोघांत आता तिसरा आला आहे, असे कॅप्शन देत सुव्रतने पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये सुव्रत म्हणाला की, ‘माझ्या आईला १९९६ पासून एक गाडी असावी अशी इच्छा होती. जवळपास २५ वर्षानंतर तिची ही इच्छा पूर्ण झाली. कोणत्याही मध्यमवर्गीय मुलाप्रमाणे माझ्यासाठीही ही एक आनंदाची गोष्ट आहे. मी पहिली गाडी सेकण्ड हॅण्ड घेतली होती. पण माझी दुसरी गाडी मात्र फर्स्ट हॅण्ड आहे. मी अनेक वर्ष गाडी न घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कामासाठी बस आणि रेल्वेवर अवलंबून राहणं शक्य नाही. शेवटी मी पेट्रोलवर चालणारी गाडी घेतली. परंतु गाडीमुळे होणारे वायू प्रदूषण थांबवण्यासाठी मी प्रत्येक सहा महिन्यात 120 झाडं लावणार आहे. व त्या झाडांची निगा राखण्यासाठी त्याला किती पैसे लागतील याचा देखील हिशोब त्यानं करुन ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर गाडीच्या एकूण किंमतीच्या पाच टक्के तो निसर्गाची हानी रोखण्यासाठी खर्च करणार आहे. ” ही योजना चाहत्यांनी देखील आमलात आणावी अशी विनंती देखील या पोस्टमध्ये सुव्रत केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय राठोडांना तात्काळ अटक करा – अतुल भातखळकर

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ म्हणाल्या…