in

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांना मोठा धक्का! स्वामी प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पार्टीत प्रवेश!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला आहे. मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी आजच अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्षात प्रवेशही केलाय. अखिलेश यादव यांनी स्वत: त्याबाबत माहिती दिली आहे.

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. ‘प्रतिकूल परिस्थिती आणि विचारसरणीत राहुनही कामगार, रोजगार आणि सहकार मंत्रीपदाची जबाबदारी अत्यंत जपून पार पाडली. असं असलं तरी दलित, शेतकरी, बेरोजगार युवा आणि लहान आणि मध्यम उद्योगाबाबत उपेक्षित वृत्तीमुळे उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे’, असं स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले.

दरम्यान 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच स्वामी प्रसाद मौर्य यांनी बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र, आता त्यांनी भाजपलाही रामराम ठोकला आणि समाजावादी पक्षाशी जवळीक साधली आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांची कन्या संघमित्रा मौर्य या भाजपच्या खासदार आहेत. वडिलांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असला तरी संघमित्रा मौर्य यांच्या निर्णयाबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Washington Sundar Covid Positive | वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटीव्ह

ऑडी इंडियाकडून Audi Q7 साठी बुकिंग्जचा शुभारंभ