in

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंतिम 15 खेळाडूंची नाव जाहीर केली आहे. विराट कोहलीकडे (Virat Kohli) कर्णधार पदाची धुरा सोपवत काही नवख्या खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या संघाचा मेन्टॉर असणार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत ही घोषणा झाली आहे. या बैठकीला बीसीसीआय अधिकाऱ्यांसह विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे जोडले गेले होते.


टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दीड वर्ष रखडलेल्या बुलेट ट्रेनबाबतच्या प्रस्तावाला चर्चेविनाच मंजुरी

Maharashtra Corona Update | राज्यात आज 4,174 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97. 09 टक्के