in

टी नटराजनने शेअर केला मुलीसोबतचा गोंडस फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा जलद गोलंदाज टी नटराजन याने आपल्या मुलीसोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान त्याच्या मुलीचा जन्म झाला असल्याने तो उपस्थित राहू शकला नव्हता. त्यामुळे त्याने पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

नटराजनची मुलगी नुकतीच चार महिन्यांची झाली असून इन्स्टाग्रामला फोटो शेअर करताना त्याने म्हटलं आहे की, “तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट आहे. आमच्या आयुष्यात आनंद असण्यामागे तू कारण आहेस. पालक म्हणून आमची निवड केल्याबद्दल तुझे आभार लाडू. खूप सारं प्रेम”.

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत नटराजनची निवड झालेली नसून त्याला कुटुंबासोबत वेळ घालवता यावा यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र १२ मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

….मग लसीकरणासाठी 35 हजार कोटींचा खर्च कशाला? पतंजलीच्या कोरोनीलवरून आयएमए संतप्त

सरकार स्वतःच्या इच्छा आणि ताकद न्यायपालिकेवर लादते; राहुल गांधींचा घणाघात