in ,

कानाखाली मारून दाखवा, महिला कंडक्टरचा रुद्रावतार; थेट आगारप्रमुखाला चॅलेंज Video Viral

पालघर : एसटी वाहक ममता पालवे यांचा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पालघर आगार येथे ममता पालवे आंदोलन करीत असताना पालघर आगारचे प्रमुख नितीन चव्हाण आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आले असता ममता पालवे आणि नितीन चव्हाणा ह्या दोघांच्या संभाषनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “मारून दाखवा ना काना खाली, मारून दाखवाना”कानाखाली”असा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पालघर आगाराच्या बाहेर एसटी कर्मचारी आंदोलन करत असता पालघर एसटी आगाराचे प्रमुख नितीन चव्हाण यांनी आगाराच्या परिसरात आंदोलन करू नका, तुम्ही कामावर रुजू व्हा असं आवाहन करीत असताना. कामबंद आंदोलन करीत असलेले कर्मचारी आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम असून आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मांडली मात्र या बाचाबाचीत कर्मचारी आणि आगारप्रमुख यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली इतकच नव्हे कर्मचाऱ्यांना कानाखाली मारण्याची भाषा आगारप्रमुख यांनी केल्याचा प्रकार समोर आला असून वाहक ममता पालवे यांचे वाहक असलेले पती केशव पालवे यांना कानाखाली मारेन या वृत्ताचा पालघर आगारप्रमुख नितीन चव्हाण यांनी इन्कार केला आहे.

मात्र, आपल्याशी झालेल्या संभाषणाच्या वेळी आगारप्रमुख नितीन चव्हाण यांनी अरेरावीची भाषा करून वाहक केशव पालवे यांच्या कानाखाली मारेन, या वक्तव्यावर ठाम असून आपण मात्र त्यांना आव्हान देत एकट्याच्या कानाखाली मारू नका. तुम्हाला मारायचे असेल तर सगळ्या कर्मचाऱ्यांच्या कानाखाली मारा, असे सूनावल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जोडप्याने बांधला दुमजली ‘मातीमहल; 700 वर्षांपूर्वीच्या तंत्रज्ञानाचा वापर

Rain Alert ; 29 व 30 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हयात पावसाची शक्यता