in

T20 World Cup 2021| आयसीसीने जाहीर केला भारतीय संघ

आगामी टी-20 विश्वचषकाला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आता या स्पर्धेला अवघे काही दिवस राहिल्याने आयसीसीने देखील सहभागी होणाऱ्या सर्व 16 संघाच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाचाही समावेश आहे.

टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | राज्यात ३ हजार ३३ रूग्ण कोरोनामुक्त

डॉ. बंग यांनी निवडलेला मार्ग आदिवासी विकासाचा; राज्यपाल कोश्यारींकडून गौरवोद्गार