in

तापसीचं पहिलं प्रेम; पण या कारणामुळं झालं होतं ब्रेक-अप

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. तापसीने बॉलिवूड बरोबरच टॉलिवूडमध्ये देखील तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाम शबाना, पिंक आणि थप्पड यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये तापसीने काम केले आहे.

सध्या तापसीचा एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तापसी तिच्या ती 9 वीमध्ये असतानाच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगत आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो द कपिल शर्मा शोमध्ये तापसीने ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या टिमसोबत हजेरी लावली होती.

यावेळी तिच्यासोबत अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा देखील शोमध्ये उपस्थित होते. यावेळी मुलाखतीमध्ये तापसीने सांगितले की,’ मी शाळेत 9 लीमध्ये होते आणि माझा बॉयफ्रेंड 10 वीमध्ये होता. 10 वीच्या बॉर्डच्या परीक्षेकडे त्याला पूर्ण लक्ष द्यायचे होते म्हणून त्याने माझ्यासोबत ब्रेक-अप केले. तेव्हा मी खूप रडले होते.’

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ST Worker Strike | कामावर हजर व्हा, अन्यथा…,- अनिल परब

वानखेडे कुटुंबाला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, नवाब मलिकांना सूचना…