in

Taj Mahal | ताजमहलमध्ये बॉम्ब? अज्ञात फोननंतर सुरक्षा तैनात

उत्तर प्रदेशातील आग्रास्थित ऐतिहासिक वारसा ताजमहलमध्ये आज सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली. गुरुवारी एका अज्ञात फोन कॉलनंतर ताजमहलमध्ये पर्यटकांसाठी तत्काळ बंद करण्यात आलं. त्यानंतर ताजमहलचे दरवाजे बंद करण्यात आले.

ताजमहलच्या आत स्फोटकं ठेवण्यात आल्याची सूचना सुरक्षा यंत्रणांना एका अज्ञात फोन कॉलवरून मिळाली होती. त्यानंतरी सीआयएसएफ आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या जवानांनी ताजमहलमध्ये उपस्थित असलेल्या पर्यटकांना तातडीनं बाहेर काढलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सचिन तेंडूलकरला ताडोबातील वाघांची भुरळ

मुंबई बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन