in

Taj Mahal | ताजमहालमध्ये बॉम्बची अफवा; तरुण पोलिसांच्या ताब्यात

ऐतिहासिक ताजमहाल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात फोनमुळे गुरुवारी सकाळी सुरक्षा खडबडून जागी झाली. दरम्यान, फेक कॉल प्रकरणात फिरोजाबादच्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. फेक कॉल करण्यामागचा तरुणाचा खुलासा ऐकल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय.

कंट्रोल रुमच्या माध्यमातून पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर ताजमहालच्या आत स्फोटकं ठेवण्यात आल्याची सूचना गुरुवारी सकाळी सुरक्षा यंत्रणांना एका अज्ञात फोन कॉलवरून मिळाली होती. ‘ताजमहालात ठेवण्यात आलेल्या स्फोटकं थोड्याच वेळात फुटतील’, अशी धमकी फोन करणाऱ्यानं दिली होती.

दुसरीकडे, पोलिसांनी हा फोन करणाऱ्या क्रमांकाला ट्रेस केलं. त्यानंतर हा फोन करणारा व्यक्ती फिरोजाबादचा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल. त्यानंतर आग्रा पोलिसांनी फिरोजाबाद पोलीस प्रशासनाला अलर्ट केलं. फिरोजाबाद पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीत या व्यक्तीनं आपणच खोटी धमकी देणारा फोन केल्याचं तरुणानं कबूल केलंय.

भारतीय लष्करात दाखल होण्यासाठी या तरुणाचे प्रयत्न सुरू होते. परंतु, लष्कर भरती रद्द झाल्यानंतर तो नाराज झाला होता. त्यामुळे फेक कॉल केल्याचं तरुणानं पोलिसांसमोर कबूल केलं. संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतल्यानंतर सुरक्षिततेची खात्री करण्यात आल्याचं आग्रा विभागाचे आयजी ए सतीश गणेश यांनी दिलीय. कंट्रोल रुमला मिळालेली सूचना चुकीच्या हेतूनं दिली गेली होती. घाबरण्याचं काहीच कारण नाही. पुढच्या तासाभरात पर्यटकांसाठी ताजमहाल खुला केला जाईल, असंही गणेश यांनी म्हटलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे

संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांच्या हाती…