in

IPL 2021 च्या प्रक्षेपणावर तालिबानची बंदी

दोन दशकानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर सत्ता स्थापन केली. सत्तास्थापने नंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानामध्ये शरिया कायदा लागू केला. या कायद्यानुसार अफगाणिस्तानातील महिलांवर कठोर निर्बंध टाकण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आयपीएल २०२१ च्या प्रक्षेपणावर तालिबानची बंदी करण्यात आली आहे.

आयपीएल २०२१ च्या (IPL २०२१) उर्वरित दुसऱ्या टप्प्याची सुरूवात रविवारपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) करण्यात आली. आता आयपीएलच्या सामन्यांदरम्यान ठराविक प्रमाणात प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात एकूण २९ सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. आता उर्वरित ३१ सामने दुबईमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण जग आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेत असताना मात्र अफगाणिस्तानमधील नागरिकांना आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेता येणार नाही. अफगाणिस्तानात आयपीएलच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे.

या सर्व प्रकाराला अफगाणिस्तानातमध्ये लागू करण्यात आलेले कायदे असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार यात इस्लामला मान्य नसलेली दृष्य असल्याचं सांगत अफगाणिस्तानमध्ये आयपीएल २०२१ च्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे. मॅचच्या दरम्यान चिअरलीडर्सचा डान्स आणि स्टेडिअममध्ये महिलांच्या उपस्थिचीचं कारण देत अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बिग बॉसच्या घरात दादूसचीच हवा

ठाकरे सरकार महाराष्ट्राची बदनामी करतायत – आशिष शेलार