अभिनेत्री मोनालिसा बागल ‘गस्त’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मोनालिसा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तानाजी गालगुंडे आणि मोनालिसा बागल ही जोडी पहिल्यांदाच या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. दोघेही कमालीचे कलाकार असल्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही जबरदस्त असेल यात शंका नाही.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना मोनालिसा म्हणाली, मी ‘गस्त’ या चित्रपटात सुजाता नावाची व्यक्तिरेखा निभावतेय. ती खूपच चंचल मुलगी आहे. ती अमर नावाच्या मुलाच्या प्रेमात आहे आणि त्याला भेटण्यासाठी ती कुठल्याही बहाणा करताना मागे पुढे पाहत नाही.
Comments
Loading…