इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात रोहित शर्माला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय, युवा खेळाडूंना, आयपीएलमध्ये चमक दाखवणाऱ्यांना स्थान देण्यात आलं आहे.
टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध एकूण पाच टी-20 सामने खेळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायो-बबलच्या नियमांनुसार हे पाचही सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहेत. भारतीय संघ सध्या तिसऱ्या कसोटीसाठी याच स्टेडियमवर सराव करत असून 24 फेब्रुवारी रोजी या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
टीम इंडियामध्ये सूर्यकुमार यादव, राहुल तेवतिया, श्रेयस अय्यर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. गोलंदाज भुवनेश्वर कुमारचंही संघात पुनरागमन झाले आहे. संघात दोन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. इशान किशनबरोबरच ऋषभ पंत हा यष्टीरक्षक आहे.
पहिला सामना 12 मार्च रोजी होणार आहे. तर 20 मार्च रोजी शेवटचा टी-20 सामना खेळविला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांचा समावेश असलेल्या टी-२० मालिकेसाठीच्या संभाव्य १५ सदस्य भारतीय संघाची घोषणा आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) केली आहे.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
Comments
Loading…