in

India vs England 4th Test | टीम इंडिया अवघ्या काही धावांनी पिछाडीवर

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने सत्राअखेरीस 6 विकेट्स गमावून 166 धावा केल्या आहेत. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानात नाबाद खेळत आहेत. टीम इडिया अजूनही 40 धावांनी पिछाडीवर आहे.

टीम इंडियाच्या फिरकीसमोर पहिल्या डावात इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं. इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स तर आर अश्विनने 3 बळी घेतले. तसेच मोहम्मद सिराजने 2 फलंदाजांना माघारी धाडले.

दरम्यान पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवातही काहीशी चांगली झाली नाही. शून्य धावावर भारताचा पहिला गडी बाद झाला. शुभमन गील शून्य धावांवर बाद झाला. रोहित शर्मा अर्धशतकापासून चुकला त्याने 49 धावा केल्या. पुजारा 17, विराट कोहली शून्य धाव, अजिंक्य 27, रविचंद्रन अश्विन 13 धावा केल्या आहेत. तर सध्या रिषभ पंत 43 आणि वॉशिंग्टन सुंदर 1धाव करून मैदानात नाबाद खेळत आहेत. टीम इडिया अजूनही 52 धावांनी पिछाडीवर आहे.

दरम्यान या कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला. त्यानंतरच्या पुढील 2 सामन्यात भारताने इंग्लंडवर मात केली. हा चौथा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमेरिकन ‘फ्रीडम हाऊस’ च्या विरोधात कंगना रणौत आक्रमक

…आत्महत्येचा मला व्हिडीओ पाठव, आयेशाचे पतीसोबतचे शेवटचे संभाषण पोलिसांच्या हाती