in

लाचखोर तहसीलदाराने चक्क 20 लाखांची केली होळी

राजस्थानच्या सिरोही येथे लाच घेणाऱ्या कल्पेश जैन या तहसीलदारानं पकडले जाऊ या भीतीपोटी घराच्या गॅसवर 20 लाख रुपये जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील गॅसवरच या तहसीलदाराने हे 20 लाख रुपये जाळले आहेत. एका प्रकरणातील चौकशीचे धागेदोरे या तहसीलदारापर्यंत पोहोचले होते, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

एसीबीने (ACB) पिंडवाड्यातील महसूल इन्सपेक्टरला एका टेंडरच्या बदल्यात 01 लाखांची लाच घेताना पकडले. या पोलीस निरिक्षकाची चौकशी केली असताना ही लाच त्याने तहसीलदाराकरता घेतली होती अशी माहिती त्याने दिली. या माहितीच्या आधारे एसीबीची टीम टीम तहसीलदार कल्पेश जैन यांच्या घरामध्ये पोहोचली. एसीबीने जेव्हा छापा टाकला त्यावेळी हे तहसीलदार पैशांना आग लावत होते. या सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. कल्पेश जैन यांनी एसीबीच्या आदेशाला न जुमानता त्याने या पैशांची होळी केली. एसीबीला पाहून जैनने दरवाजा तोडून आत गेले असता. कल्पेश जैन 20 लाख रुपये गॅसवर जाळत असतानाचे दृश त्यांना दिसले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘लूज बॉल सीमारेषेपार पाठवतोच’; देवेंद्र फडणवीसांची सत्ताधाऱ्यांवर तुफान फटकेबाजी

बर्थ डे सेलिब्रेशन पडलं महागात !