in

चंद्रपूरच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात कामगाराच्या मृत्यूनंतर तणाव

चंद्रपूरच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात कामगाराच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण झाला आहे.  रुग्णवाहिकेत कामगाराचे शव ठेवत वारसांना नोकरी आणि नुकसान भरपाईच्या रकमेसाठी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. कंत्राटी कामगार असलेल्या ईश्वर खिलारकर याचा 10 जून रोजी अल्ट्राटेक  सिमेंट उद्योगात अपघात होत तो जखमी झाला होता. चंद्रपूरच्या खाजगी इस्पितळात दीर्घ उपचारानंतर आज त्याचा मृत्यू झाल्यानंतर कंपनी प्रशासनाने उपचाराच्या रकमेसह इतर सर्व सुविधा देण्यास नकार दिल्याने कामगार संतापले आहेत. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे पूर्णवेळ कामगार -कंत्राटी कामगारांनी न्याय्य मागण्यांसाठी प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे. स्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त लावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नागपूरसह पाच जिल्ह्यांमध्ये झेडपी आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर!

अर्जुन कपूरने काढला ‘हा’ टॅटू