in

मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात

विकास काजळे, प्रतिनिधी

मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी जवळील बोरटेम्भे ब्रिजवर ट्रकला मध्यरात्री 2 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चा काही भाग रेल्वे ब्रिजवर अधांतरी लटकला होता. ब्रिजच्या संरक्षक भिंतीचा कठडा तुटून रेल्वे ट्रॅकवर पडून ट्रकचा एक टायर ही निखळून ट्रॅकवर पाडला होता ट्रक खाली पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वेची दुर्घटना राहत दल, आर पी एफ, लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तीन तासाच्या अथक प्रयत्नंतर ट्रकला बाजूला करण्यात आले असून मध्यरेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सावंतवाडी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली लाडक्या बालगणेशाची मूर्ती