in ,

जम्मू काश्मीरमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला

भाजप नेते अन्वर खान यांच्या श्रीनगरच्या घरी गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात पोलिस दलातील कॉन्स्टेबल रमीज राजा जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ते शहीद झाल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अन्वर खान हे बारामुल्लाचे जिल्हा सरचिटणीस असून कुपवाडाचे प्रभारी देखील आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले . जखमी पोलिसांच्या रायफल घेऊन दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी सोमवारी देखील दुपारी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात दहशतवाद्यांनी पालिका कार्यालयावर गोळीबार केला

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नजरचूक वगैरे काही नाही; केंद्राचा ‘तो’ निर्णय ‘एप्रिल फूल’ पण असू शकतो

‘या’ देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा