in ,

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून दोन परप्रांतीयांची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आज दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या ईदगाह भागात बिहारच्या पाणीपुरीवाल्याच्या डोक्यात गोळी मारली. तर आणखी एका घटनेत पुलवामामध्ये मूळच्या उत्तर प्रदेशच्या सुतारावर गोळ्या झाडल्या. त्यात दोघांचाही मृत्यू झाला.

अरविंद कुमार साह असे बिहारच्या पाणीपुरीवाल्याचे नाव असून दुसरा हल्ला यूपीच्या सागिर अहमदवर करण्यात आला. तो सुतारकाम करायचा. या दोन्ही हल्ल्यानंतर हिंदुस्थानी जवानांनी तो भाग घेरला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये सामील असलेला लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी उमर मुश्ताक खांडे आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. पुलवामाच्या पंपोरमध्ये सुरक्षा दलांनी खांडे याच्यासह अन्य दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे.

गुरुवारी पुंछमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हिंदुस्थानी लष्कराचे नायक हरेंद्र सिंह आणि सुभेदार अजय सिंह हे दोन जवान बेपत्ता झाले होते. लष्कराच्या शोधमोहीमेत आज या दोघांचेही पार्थिव सापडले. यामुळे या चकमकीतील शहीद जवानांची संख्या 9 आता झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंधन परत महागले, जाणुन घ्या आजचे दर

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक