लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेला सर्वसाधारण अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्री असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचा आरोप खोडून काढला.
अर्थसंकल्पावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चर्चेला उत्तर दिलं. अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्रीय असल्याचा हा विरोधकांचा आरोप चुकीचा असून, गरीबांना मदत करणारा आहे. अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळणार असल्याचा दावा सीतारामन यांनी केला.
Comments
Loading…