in

सत्याग्रही घाटात ‘द बर्निग’ ट्रक

वर्धा | भूपेश बारंगे : नागपूर अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास अमरावती कडून नागपूरला कास्टिक सोडा पावडर घेऊन जात असलेल्या ट्रकच्या कॅबिन खालच्या भागात शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागली. चालकाच्या सतर्कतेने ट्रक थांबवून चालकाने उडी घेत.

कसाबसा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यात कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक समोरील कॅबिनचा संपूर्ण भाग जळून खाक झाला होता.लगेचच महामार्गलगत असलेल्या सीडीएट कंपनीतील टँकर पाणी आणून आग विझवण्यात आले. आग विझवण्यात आल्याने ट्रक मधील कास्टिक सोडा पावडरच नुकसान झाले नाही. राष्ट्रीय महामार्ग सहावर रस्त्याच्या मध्यभागी ट्रकने घेतलेल्या अचानक आग मुळे रस्त्याच्या एकतर्फी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया,पोटातून ५ किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी मानवी साखळी आंदोलन