in

अनिल देशमुखांच्या जवळच्या नातेवाईकांच्या कॉल रेकॉर्डिंगची CBI करणार तपासणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. आता अनिल देशमुख यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या कॉल रेकॉर्डिंगची तपासणी सीबीआय करणार आहे.

ज्यामध्ये पोलिसांच्या बदल्या संदर्भातलं संभाषण असण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या जवळच्या एका नातेवाईकाचं संभाषण रश्मी शुक्ला यांनी सीबीआयला दिलं होतं. शंभर कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून तपास केला जात असून त्याबरोबरच पोलीस दलातील बदली प्रकरणाची सुद्धा चौकशी सीबीआय करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा’

चार पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मुंबईबाहेर बदल्या