संयुक्त राष्ट्रसंघातील महत्त्वाच्या पदावर आणखी एका भारतीय महिलेची वर्णी लागली आहे . अमेरिकेच्या बायडेन प्रशासनात अनेक भारतीय वंशाच्या महिलांची वर्णी लागली. संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी भारतीय अर्थशास्त्रज्ञ लिगिया नॉरोन्हा यांची संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमच्या सहाय्यक सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
नोरोन्हा यांची एवढ्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे भारतातील विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. लिगिया नोरोन्हा ह्या एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी शाश्वत विकासात भरीव कामगिरी केली आहे. तसेच त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा 30 वर्षांचा तगडा अनुभव आहे.तसेच त्यांनी संसाधन, नियमन आणि ग्लोबल सिक्युरिटी सेक्शनच्या संचालिका म्हणूनही काम पाहिलं आहे.
Comments
Loading…