in ,

मुंबईतील महाविद्यालय ‘या’ दिवशी सुरु होणार

येत्या 20 ऑक्टोबरपासून मुंबईतील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने आपल्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना सुरू करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे तसेच 20 ॲाक्टोबरपासून मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून विद्यापीठानं एसओपी जाहीर केलेत. महाविद्यालय खुले होणार पण वसतिगृह खुल्याकरण्या बाबतीत अजूनही संभ्रम कायम आहे.

नियम पुढीलप्रमाणे असतील

  • 18 वर्षांवरील विद्यार्थी ज्यांचे दोन डोस घेतलेले आहेत त्यांनाच परवानगी देण्यात येईल.
  • महाविद्यालय सुरू करताना कोरोना प्रादुर्भाव रूग्ण संख्या याचा आढावा स्थानिक प्रशासन , महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी संयुक्त विचारविनिमय करून घेता येईल.
  • कोरोना व्यवस्थापनाचे राज्य सरकारने आणि आयसीएम आर गाईडलाईन्सची अंमलबजावणी करत महाविद्यालय सॅनिटाइझ करणे स्वच्छता राखणे सुरक्षित अंतर मास्क या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
  • लसीकरण पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात येणे शक्य नसेल त्यांना ॲानलाईनचा पर्याय खुला असेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सोने- चांदीचे भाव वाढले, जाणून घ्या दर

परतीच्या पावसाने कापूस काळवंडला, सोयाबीनही गेले