in ,

Suez Canal : सुएझ कालव्यातून एव्हर ग्रीन जहाज काढण्यात अखेर यश

इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकून पडलेलं विशाल मालवाहू जहाज बाहेर काढण्यात पाच दिवसांनंतर यश आलं आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तैवानमधील एव्हरग्रीन मरीन कंपनीचं 2,00,000 टन वजनाचं एव्हर गिव्हन हे जहाज जोरदार वाऱ्यामुळं सुएझ कालव्यातील मार्गावर अडकलं होत. या घटनेमुळं अतिशय महत्वाच्या असलेल्या या समुद्री मार्गावरील दोन्ही बाजूला अनेक जहाजं अडकून पडली. सुएझ कालवा हा भूमध्य समुद्र आणि रेड समुद्राला जोडतो. हा आशिया आणि युरोप दरम्यानचा सर्वातजवळचा समुद्री मार्ग देखील आहे. मंगळवारी एका निमुळत्या भागात ते आफ्रिका व सिनाई द्वीपकल्पात ते जहाज अडकून पडलं, त्यामुळे मोठी सागरी वाहतूक कोंडी झाली होती. हे अवाढव्य जहाज कालव्याच्या सहा किलोमीटर उत्तरेला दक्षिण प्रवेशद्वाराकडे ते सुएझ शहरानजीक अडकून पडलं होतं. मंगळवारपासून या जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पाच दिवसांनंतर म्हणजेच रविवारी सायंकाळी या प्रयत्नांना यश आलं.

बर्नहार्ड शुल्ट जहाज व्यवस्थापन कंपनीचे तंत्रज्ञान व्यवस्थापक एव्हर गिव्हन यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी हे जहाज बाजूला काढण्याचे प्रयत्न फसले होते. हे मोठे जहाज हलवण्यासाठी आतल्या भागात पाणी ओतून विशिष्ट यंत्रणेचा वापर करून ते दूर करण्याचा प्रयत्न रविवारी करण्यात आले. या प्रयत्नांमध्ये अनेक टग बोट्स म्हणजेच मोठे जहाज अडकल्यानंतर ते खेचून बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारी विशेष बोटी वापरण्यात आल्या. या प्रयत्नांना यश आलं असून हजारो कंटेनर असणारं हे जहाज बाहेर काढण्यात आलं आहे.

What do you think?

-5 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

नगरसेविकेच्या मुलाचा डोक्यात गोळी लागल्यानं मृत्यू