राज्यात सगळ्याच मंत्र्यांचे कार्यक्रम चालू आहेत मात्र अधिवेशना दरम्यानचं त्यांना कोरोना दिसतो. सरकारला कामकाज करायचंच नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला आहे.
सरकारकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत. म्हणून कोरोनाच्या नावावर सरकार अधिवेशनापासून पळ काढल जात आहे. मात्र आम्ही प्रश्न मांडायचे कुठे असा सवाल फडणवीस यांनी सरकारला केला आहे.
कोरोनाच्या नावाखाली अधिवेशनाचा काळ कमी करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काहीही देणेघेणे नसल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. वीजबिल वाढ, संजय राठोड प्रकरणावर विरोधक आक्रमक होणार हे सरकारला माहीत असल्याने सरकारने अधिवेशनातून पळ काढतेय. दरम्यान अधिवेशनात जो कालावधी मिळेत त्या कालावधीत आम्ही सरकारला जनतेच्या प्रश्नांवर उत्तरं द्यायला भाग पाडू असेही फडणवीस म्हणाले.
पूजा चव्हाण प्रकरणाच्या चौकशीची भीती- प्रविण दरेकर
कोरोना वायरसचे नियम पाळून काळजी घेता येते. मात्र पूजा चव्हाणच्या प्रकरणात चौकशी होईल म्हणून सरकार पळ काढत असल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पूजा चव्हाण हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.या प्रकरणात पुरावे म्हणून वेगवेगळे फोटो, क्लिप आहेत. या घटनेत हत्या होते, पण एफआयआर सुद्धा दाखल होत नाही असेही ते म्हणाले.
Comments
Loading…