लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यातील वाद विझातना दिसतं नाही आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.
राज्यपाल आज सकाळी दहा वाजता मसुरी येथे नवनियुक्त आयएएस अधिकारी 122 बॅच कार्यक्रम यासाठी जाणार होते. त्यासाठी ते विमानतळावर गेल्यावर उड्डाण घेण्याचे परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद आलाच नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी पेटताना दिसत आहे.
Comments
Loading…