in

महायुद्धातील ‘तो’ बॉम्ब फुटला

महायुद्धातील ९०० किलोग्रॅमचा एक बॉम्ब नुकतच लंडन च्या एक्सेटर शहरात फुटला. याची माहिती पोलिसांनी दिली गेली होती आणि तपासानंतर हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील भयंकर बॉम्ब निघाला. हा बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी संपूर्ण शहरच रिकामं करावं लागलं. नुकताच या बॉम्ब धमाक्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे.

एक्सेटर शहरातील रहिवाशी भागात एक बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. हा बॉम्ब शुक्रवारी एक्सेटर यूनिव्हर्सिटी च्या कंपाउंडमध्ये बघितला गेला होता. यानंतर बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलिसांनी संपूर्ण शहर रिकामं केलं. यूनिव्हर्सिटीतील १४०० विद्यार्थ्यांसहीत ग्लेनोर्नरोडवर राहणारे जवळपास २६०० घरातील लोकांना येथून हलवण्यात आलं. शुक्रवारी आणि शनिवारी या सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं होतं. हा भयंकर बॉम्ब रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी डिफ्यूज करण्यात आला होता.

या बॉम्बचा धमाका इतका शक्तीशाली होता की, याचा आवाज जवळपास १० किलोमीटरपर्यंत ऐकायला आला होता. अनेक भींती आणि खिडक्या तुटल्या आहेत. बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतरही लोकांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी अजून देण्यात आलेली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फोटो मॉर्फ प्रकरणी चित्रा वाघ यांनी केली पोलिसात तक्रार

महायुद्धातील ‘तो’ बॉम्ब फुटला