कोकणासाठी अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोकण रेल्वे प्रशासनाने आता प्रगतीची आणखी दोन पाऊले यशस्वीपणे टाकली असल्याने आता यामार्गावरील प्रवास हायटेक होणार आहे. आतापर्यंत डिझेल इंधनावरती धावणाऱ्या गाड्या आता हायव्होल्टेज विद्युत पुरवठ्यावरती लवकरच धावणार आहे.
यासाठी रोहा ते रत्नागिरी या 203 किलोमीटर इतक्या अंतरा पर्यंत 25 हजार किलोवॅट पाॅवर सप्लाय चे विद्युत प्रवाह जोडणीची कामे पूर्ण झाली. 23 फेब्रुवारीपासून या प्रवाहाची तपासणी करण्यात आल्यानंतर गुरूवारी पहिल्यांदाच इलेक्ट्रीक सप्लाय वरती धावणारे इंजिन या मार्गावर चालवून रोहा ते रत्नागिरी अशी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला असून यामुळे कोकण रेल्वेच्या या मार्गावर आता इलेक्ट्रीक सप्लाय वरती लवकरच लांबपल्ल्याच्या तसेच लोकल गाड्या धावण्यासाठी हिरवा कंदील मिळेल. प्रत्येक नव्वद किलोमीटर इतक्या अंतरावर इलेक्ट्रीक चे सबस्टेशन उभारण्यात आले असून एल एन टी या कंपनीने हे काम पूर्ण केले आहे.
Comments
Loading…