in

जर्मनीत डॉक्टर असल्याची बतावणी करत वकीलाला घातला 15 लाखांचा गंडा

संजय देसाई | जर्मनीत डॉक्टर असल्याचे बतावणी करत वकील महिलेला घातला 15 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याने ही फसवणूक केली. दरम्यान त्याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सांगलीच्या विटा जवळील लेंगरे येथे राहणाऱ्या वैभव शिंदेने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर भरत जाधव या नावाने खोटे अकाउंट बनवले होते. या अकाउंटचा व्यक्ती परदेशात राहतोय असे भासावे म्हणून त्याने मॉडेल सारखे फोटो फेसबूक, इंस्टाग्राम वॉलवर लावले होते. तसेच त्याने अनेकांना या खोट्या अकाउंटद्वारे रिक्वेस्ट पाठवायला सुरुवात केली. यातील एक रिक्वेस्ट मुंबईतील एका महिला वकीलाला पाठवली.

 फेसबुक आणि इन्स्टंग्राम या सोशल मीडियावर वैभव शिंदे याने त्याच्या प्रोफाईलमध्ये तो जर्मनी या देशात डॉक्टर व्यवसाय करत असल्याची खोटी माहिती दिली.मुंबईतील या वकील महिलेने वैभवने बनवलेल्या अकाउंटवर चॅटिंग सुरू केले.त्यानंतर वैभवने आपला मोबाईल क्रमांक महिला वकिलाशी चॅटद्वारे शेअर केला. त्यानंतर व्हाट्सअपच्या माध्यमातूनही या दोघांचे चॅटिंग सुरू झाले.व्हॉटसअपद्वारे मसेजेस, फोन कॉल करुन आणखी विश्वास संपादन केला.

महिला आपल्या जाळ्यात फसल्याचे कळताच तिच्याकडून वैभव शिंदेने वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून तब्बल १४ लाख ९२ हजार रुपये घेतले. आणि अखेरीस ७ जूनला वैभव शिंदे याने अचानक सोशल मीडियावरची आपली भारत जाधव नावाने काढलेली सगळी अकाऊंटस डीलीट केली.

दरम्यान या घटनेत आपली फसवणूक झाल्याचे कळताच वकील महिलेने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. त्यावरून संबंधित नंबर सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावातील वैभव शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर तत्काळ या वकील महिलेने विटा पोलिस ठाण्याकडे धाव घेत  तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Karnala Bank Scam | माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

Maratha Reservation | संभाजीराजेंचं आज कोल्हापुरात मूक आंदोलन