in

तुम्हालाही जाणून घ्यायचा आहे का? ‘बेला चाओ’ या गाण्याचा अर्थ

शुक्रवारी अखेर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’चा पाचव्या सिझनचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या सीरिजचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. भारतातही या सीरिजची प्रचंड प्रमाणात क्रेझ आहे. ही सीरिज प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

दरम्यान या सीरिज इतकच यातील गाणं ‘बेला चाओ’ देखील लोकप्रिय आहे. त्यामुळे या गाण्याचा अर्थ शोधण्यासाठी प्रेक्षक प्रयत्न करत आहेत. या गाण्याच्या मागे एक इतिहास असल्याचं सांगितलं जात उत्तर इटलीमध्ये गरीब महिलांना जबरदस्तीने कमी पगारात काम करायला लावायचे. त्यांना खुप त्रास सहन करायला लागायचा आणि म्हणून त्यांनी बेला चाओ हे गाणं तयार केलं. या गाण्याचा अर्थ आहे “खुप त्रास आहे, पण तो दिवस येईल जेव्हा आपण सर्वजण स्वातंत्र्यात काम करू”. कालांतरानी, बेला चाओ हे इटालियन लोकगीत ठरलं, जे फॅसिस्ट लोकांच्या विरोधात राष्ट्रगीत म्हणून वापरले गेले आणि जगभरात गायले गेले.

‘मनी हाइस्ट’च्या पहिल्या सिझनपासून हे गाणं वेगवेगळ्या प्रसंगाला ऐकायला येते. “बेला चाओ हे गाणं प्रोफेसरच्या आजोबांनी त्याला शिकवले , ज्यांनी इटलीमध्ये फॅसिस्टांविरोधात लढा दिला होता, आणि नंतर प्रोफेसरने या चोरांच्या टोळीला.” त्यांनतर ‘बेला चाओ’ या गाणं इतक लोकप्रिय आहे की नंतर याच्या अनेक आवृत्ती आल्या.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Belgaum Municipal Election Result | कर्नाटक सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून आणला; संजय राऊतांचा गंभीर आरोप

‘बेळगाव झांकी आहे, पण मुंबई अभी बाकी है’, चंद्रकांत पाटलांचं थेट आव्हान