in

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला, अशी आहे नवी नियमावली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण आता लोकांचं मनोरंजन पुन्हा सुरू होणार आहे. चित्रपटगृह आणि नाट्यगृह उघडण्याचा मुहुर्त अखेर ठरला आहे.

नाट्यगृह, चित्रपटगृह उघडण्याचा आणि इतर महत्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 22 ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पुन्हा सुरू होणार आहेत. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने नवी नियमावली जाहिर केली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी नाही. तसेच मास्क आणि सॅनिटासझरचा वापर बंधनकारक आहे. कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी करणं बंधनकारक आहे. आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करण्याची परवानगी नसणार आहे.

सर्वांना आरोग्य सेतू अॅपचा वापर बंधनकारक आहे. कलाकार आणि प्रेक्षक सर्वांचे लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक आहे. कलाकारांना कक्षात जाऊन भेटण्याची परवानगी नाही. केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई कीट परिधान करणं बंधनकारक आहे. या नियमांचे पालन करणे सर्वांसाठीच बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.

 • राज्यात आता खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी
 • २२ ऑक्टोबरपासून बंदिस्त, खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार
 • यंदा दिवाळी पहाट आणि पाडवा पहाटसारखे कार्यक्रम घेता येणार
 • बंदिस्त, खुल्या जागेतील कार्यक्रमास मुभा
 • कार्यक्रमाला प्रवेश देते वेळी शरिराचं तापमान तपासणं बंधनकारक
 • बंदिस्त सभागृहात एकुण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
 • कार्यक्रमावेळी ६ फुटांचे सामाजिक अंतर राखणे बंधनकारक
 • कार्यक्रमाचे आयोजक, प्रेक्षक सर्वांना मास्क घालणे बंधनकारक
 • बालकलाकारांव्यतिरिक्त सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक
 • खुल्या जागेत कार्यक्रम घेताना ६ फुटांवर खुणा करून बसण्याची व्यवस्था करावी
 • गर्दी नियंत्रणासाठी आयोजकांकडे सुरक्षा व्यवस्था असावी
 • खुल्या जागेत कार्यक्रम असताना खाद्यपदार्थ, पेय विक्री करण्यास बंदी
 • रंगभूषाकारांनी कार्यक्रमात पीपीई किट परिधान करणे बंधनकारक
 • कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी नसेल

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला परवानगी नाही’

ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं