लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न, उपक्रम , राबविले जाताना कायद्याचेही जोड देण्यात आली आहे. मात्र एकीकडे मराठीचा गौरव जपला जात असताना मुंबई महापालिकेत अजूनही मराठी भाषा विभागाचे कोणतेही स्वंतत्र अस्तित्व निर्माण झालेले नाही. याचं पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिकेला मराठी भाषा विभाग निर्मितीसाठी मुहूर्त मिळत नाहीये… टक्केवारी मिळत नसेल तर उगाच कष्ट कशाला घ्या? असा साधा सरळ हिशोब असावा.. असं ट्वीट करत सरकारला टोला लगावला आहे.

मुंबई पालिकेच्या कारभारची आणि कामकाजाची भाषा विभाग स्थापन झालेली नाही. पालिका सभागृहाने पालिकेच्या कामकाजाची मराठी अधिकृत भाषा असावी यासाठी 30 मार्च १९७२ साली ठराव संमत केला आहे. त्यास 49 वर्ष उलटून गेली असली तरीही संपूर्ण कामकांजासाठी म्हणून मराठी भाषा विभाग स्थापन करण्यात पालिकेला यश मिळाले नाही.
Comments
Loading…