in ,

मेट्रो प्रकल्पाचा हलगर्जीपणा; पाच ते सहा कामगार गंभीर जखमी

भिवंडीत ठाणे अंजुरफाटा नाक्याजवळ मराठा पंजाब हॉटेल शेजारी दुर्घटना घडली. लोखंडी सळईचा सांगाडा अचानक कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली असून या दुर्घटनेत पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले जखमी कामगारांन एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेक्ष. तीन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे.

भिवंडीत ठाणे अंजुरफाटा कल्याण नाका ते कल्याण असा मेट्रो पाच प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. भिवंडीत मागील तीन वर्षांन पासून मेट्रो पाच प्रकल्पाचे काम सुरु आहे. मेट्रो पाच प्रकल्पाच्या हलगर्जी कारभाराबाबत भिवंडीतील अनेक पक्ष संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. भिवंडीत मेट्रो प्रकल्पात कोणतीही प्रकारची दक्षता घेण्यात नसल्याचे दिसत होते. असं असतानाच शनिवारी लोखंडी सळईचा कॉलम सांगाडा कोसळल्याने मेट्रो पाच प्रकल्पातील हलगर्जीपण चव्हाट्यावर आली आहे

या दुर्घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सळईचा पडलेला सांगाडा क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे काही काळ अंजुरफाटा मानकोली व अंजुरफाटा ठाणे मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. लांबच लांब रंग लागल्याचे दिसत होते .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एका पोलिसाचाही सहभाग

माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार, पोलिसांच्या C-60 दलाला मोठं यश