in ,

राज्यात 1 मार्चपासून लसीकरणाचा पुढचा टप्पा, ‘यांना’ देणार लस..

.The Union Minister for Environment, Forest & Climate Change, Information & Broadcasting and Heavy Industries and Public Enterprise, Shri Prakash Javadekar holding a press conference on Cabinet Decisions, in New Delhi on October 21, 2020.

देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, तर दुसरीकडे सरकार कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण करत आहे. आता 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरू होतं आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

गंभीर आजार असलेल्या 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येईल. देशात 10 हजार सरकारी सेंटर्स आहेत, तिथे लसीकरण करणाऱ्यांना मोफत लस देण्यात येणार आहे. जे जेष्ठ नागरिक खासगी रुग्णालयातून लस घेतील, त्या नागरिकांना लसीकरणासाठी पैसे मोजावे लागतील. आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच लसीसाठी एक किंमत ठरवून देण्यात येईल, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

आतापर्यंत 16 जानेवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत 1.07 कोटी नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे, तर यातील 14 लाख कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा लसीकरण करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव; चिकन विक्रीस बंदी

वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोना, 4 कर्मचाऱ्यांनाही लागण