राज्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, आज कोरोना रुग्णांचा आकडा हा 5 हजार पार गेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. दरम्यान वाढत्या रुग्णवाढीनंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात आता संचारबंदी व लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लॉकडाऊन नाही…पण मुंबईकरांसाठी नवीन कडक नियमावली
मागील २४ तासांत राज्यात ५ हजार ४२७ नवे कोरोनाबाधित वाढले असुन, एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८१ हजार ५२० वर पोहचली आहे. तसेच २ हजार ५४३ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. आतापर्यंत राज्यभरात १९ लाख ८७ हजार ८०४ जण करोनातून बरे झाले आहेत. आज ३८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजपर्यंत करोनामुळे ५१ हजार ६६९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुन्हा धोक्याची घंटा : मुंबई उपनगरात पुन्हा तयार होतायत ‘हॉटस्पॉट’
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.५ टक्के आहे. तर, अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४० हजार ८५८ इतकी आहे. यावरून कोरोनाचे संकट हळूहळू पुन्हा गडद होतं की काय? अशी भीती सर्वसामान्यांना सतावतेय.
कोरोना हॉटस्पॉट
मुंबईत मुलुंडमधील 171, घाटकोपर 185, कुर्ला 36, चेंबूर 35, सांताक्रूझमध्ये 47 इमारती सील आहेत. तर भांडुप पवई विक्रोळीत 10, घाटकोपर 10, कुर्ला 8, खार 6, चेंबूर 5, तर मुलुंडमध्ये 4 झोपडपट्ट्या आणि चाळी महापालिकेने कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत.
Comments
Loading…