लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा कमी झाला होता की, लवकच महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल, अशी चिन्हे दिसू लागली. पण गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. मात्र, त्याचबरोबर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील जवळपास तेवढीच असल्याने हा दिलासा ठरला आहे.
राज्यात काल (14 फेब्रुवारी) दिवसभरात 4 हजार 92 रुग्ण आढळले होते. तर, आज (15 फेब्रुवारी) 3 हजार 365 नवे रुग्णांचे निदान झाले. आजपर्यंत कोटी 53 लाख 59 हजार 26 नमूने तपासण्यात आले. त्यापैकी 20 लाख 67 हजार 643 नमुने (13.46) टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 74 हजार 704 व्यक्ती होमक्वारंटाइन असून 35 हजार 201 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत,
तर दुसरीकडे, दिवसभरात 3 हजार 105 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यानुसार 19 लाख 78 हजार 708 रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.7 टक्के झाले आहे. राज्यात 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 51 हजार 552 वर पोहचला असून मृत्यूदर 2.49 टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Comments
Loading…