in ,

Coronavirus: राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 7 हजारावर

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 7 हजारावर पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता पुन्हा वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनचे संकेत दिले. मात्र जर अशीच रुग्णसंख्या वाढली तर राज्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता आहे.

मागील २४ तासांमध्ये राज्यात ६ हजार ९७१ कोरोनाबाधित वाढले असुन, ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २१ लाख ८८४ वर पोहचली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात २ हजार ४१७ जण कोरोनातून बरे झाले. तर, एकूण १९ लाख ९४ हजार ९४७ जणांनी कोरोनामुक्त झालेले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५२ हजार ९५६ असुन, आजपर्यंत ५२ हजार ९५६ रुग्णांचा राज्यभरात कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९४.९६ टक्के आहे.

“आपल्या राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वार काढतोय. त्यामुळे आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार उद्यापासून राज्यात सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवासांसाठी बंदी असेल” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना नियम तोडणाऱ्या रेस्टॉरंट व क्लबवर महापालिकेची धडक कारवाई

Big Boss 14 Finale: रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14ची चॅम्पियन