लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यामध्ये गेले तीन दिवस कोरोनाचे जवळपास साडेतीन हजार रुग्ण दररोज सापडत आहेत. तथापि, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील कमी होत चालली आहे. त्यामुळे चिंता वाढत चालली असून रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे आव्हान कायम आहे.
गेल्या 24 तासांत राज्यामध्ये 3 हजार 611 कोरोनाच्या नव्या रुग्णांचे निदान झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 52 लाख 72 हजार 826 नमुन्यांपैकी 20 लाख 60 हजार 186 नमुने म्हणजेच 13.49 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 75 हजार 418 व्यक्ती होम क्वारंटाइन तर, 1 हजार 746 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
राज्यात आज 1 हजार 773 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 74 हजार 248 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.83 टक्के झाले आहे. राज्यात सध्या असून 33 हजार 269 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
तर, राज्यात आज 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा 51 हजार 489वर पोहोचला असून मृत्यूदर 2.5 टक्के आहे.
Comments
Loading…