in

कोल्ह्यामुळे रखडलं विमानाचं लँडिंग

मुंबईवरून सिंधुदुर्ग विमानतळावर उतरणार्‍या विमानाच्या पायलटला धावपट्टीवर प्राणी असल्याचे निदर्शनास आले. हे विमान धावपट्टीवर न उतरता पायलेटने पुन्हा विमान आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला धावपट्टीवर कोणता तरी प्राणी असल्याचे सांगितले.

तात्काळ सुरक्षा यंत्रणेकडून धावपट्टीवर पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास कोल्हा असल्याचे दिसून आले या सुरक्षा यंत्रणेने कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढले त्यानंतर दहा मिनिटांनी या धावपट्टीवर हे विमान उतरविण्यात आले मात्र याची चर्चा प्रवाशांमध्ये चांगलीच रंगली होती या विमानतळाच्या सर्व बाजू संरक्षण भिंतीने बंदिस्त केले आहेत तरी हा कोल्हा कोणत्या मार्गाने धावपट्टीवर आला याचा शोध मात्र सुरक्षा यंत्रणा घेत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मेट्रोच्या वेळेत आजपासून वाढ; घाटकोपर-वर्सोवा मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

विमान प्रवास होणार स्वस्त! आजपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरू