in , ,

कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्रातील २५० मेगावॅट संच करण्यात आला बंद

राज्यात गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस सुरू असून विदर्भातील नागपूर, चंद्रपूर विभागात असलेल्या कोळशाच्या खाणीत पाणी शिरल्याने याचा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला आहे. विदर्भातील कोळशाच्या खाणी मधून वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवला जातो. मात्र कोळशाच्या उत्पादनात घट झाल्याने राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना अत्यंत कमी प्रमाणात कोळशाचा पुरवठा होत आहे. वेकोलिकडून तीन महिन्यांपासून महानिर्मितीच्या वीज प्रकल्पांना अपेक्षित मागणीच्या ५० टक्केच कोळसापुरवठा केला जात आहे. यामुळे वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची प्रचंड टंचाई जाणवत आहे.

महाजेनकोकडे सोमवारी केवळ १ लाख ६३ हजार ८९५ मेट्रिक टन साठा उपलब्ध होता. हा साठा केवळ एकच दिवस पुरू शकतो. पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने राज्यावर वीज संकटाचे सावट घोंगावते आहे. कोळशाच्या टंचाई मुळे दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 210 मेगावॅट संच बंद करण्यात आला आहे. येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात केवळ एक दिवस कोळसा साठा शिल्लक होता. 1 लाख 12 हजार मेट्रिक टन असा सात दिवसांचा कोळसा साठा शिल्लक असणे अपेक्षित असतांना केवळ एक दिवस पुरेल एवढा 16 हजार मेट्रिक टन कोळसा दीपनगर केंद्रात शिल्लक होता.

त्यामुळे एक दिवस जरी कोळसा पुरवठा खंडित झाला तर वीज निर्मितीवर परिणाम होउ शकतो. तसेच 3 पैकी 1 वीज निर्मिती संच बंद करण्यात आली असल्याची माहिती दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी दिली आहे. दरम्यान रोज गरजेनुसार कोळसा उपलब्ध होत असल्याने तूर्तास तरी वीज निर्मिती वर परिणाम झाला नसला तरी एक दिवस ही कोळसा पुरवठा खंडित झाल्यास दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील निर्मिती ठप्प होण्याचा धोका वाढला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सांगलीत सापडला साडेनऊशे वर्षांपूर्वीचा जैन शिलालेख

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा अल्पवयीन मुलीची हत्या