in ,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्यात वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची रूग्ण संख्या पाहता नवे नियमावली जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1 लाख 68 हजार 63 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 277 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 69 हजार 959 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. या ऑनलाईन बैठकीदरम्यान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यासोबत साधणार संवाद आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

१९८२ साली उभारलेल्या यंत्रणेत अद्याप सुधारणा नाही, विद्युत पुरवठा यंत्रणा सुधारण्यासाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा लढा

वैष्णो देवी परिसात हिमवृष्टी, परिसरात बर्फाचा जाड थर