in

प्रवाशांच्या चोरी झालेल्या सामानाची जबाबदारी रेल्वेची असणार

लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भारतीय रेल्वे प्रशासनाने दाखल केलेली एक याचिका फेटाळली आहे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलेल्या आदेशावाविरोधात रेल्वेने दाखल केलेली तक्रार सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने प्रवाशांच्या चोरी झालेल्या सामानाची भरपाई देण्याचे आदेश रेल्वेला दिले होते. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

न्या. डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. दिल्ली ते सिंकदराबाददरम्यान प्रवास करताना एका महिला प्रवाशाचं सामान चोरीला गेल्याप्रकरणी एक लाख ३३ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. इतकचं नाही तर न्यायालयाने या प्रकरणामध्ये इतक्या शुल्लक नुकसानभरपाईसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये रेल्वेकडून याचिका दाखल कऱण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

नुकसानभरपाई फक्त एक लाख ३३ हजारांची आहे या प्रकरणामध्ये. काय हे?,” असं म्हणतं न्यायालयाने रेल्वेची याचिका फेटाळून लावली. दिल्ली ते सिकंदराबाद प्रवास करणाऱ्या तक्रारदार महिलेने रेल्वेच्या सीटखाली सामान बांधून ठेवण्यासाठी साखळी उपलब्ध नसल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. साखळीला सामान न बांधल्यानेच माझ्या सामानातील एक बॅग चोरीला गेल्याचंही या महिलेने म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी अनधिकृत पद्धतीने, तिकीट नसताना लोकांना बेकायदेशीरपणे रेल्वे प्रवेश करण्यापासून थांबवलं नाही. त्यामुळेच ही चोरी झाल्याचा दावाही या महिलेने केलाय.

या प्रकरणामध्ये आपली बाजू मांडताना रेल्वे प्रशासनाने संबंधित महिला प्रवाशाने तिच्याकडील सामानामध्ये महागड्या साड्या आणि दागिने असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली नसल्याचं म्हटलं. तसेच रेल्वेने या महिलेची जी बॅग चोरीला गेलीय त्यामध्ये मैल्यवान सामान होतं यासंदर्भातील पुरावेही सादर केले नसल्याचा दावा केला. या प्रकरणामध्ये संबंधित महिलेने सामान वाहून नेण्यासाठी लागणारं विशेष तिकीट किंवा रेल्वेच्या इतर सुविधा घेतल्या नव्हत्या असंही रेल्वेनं म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणे आत्महत्या प्रकरण : चौकशीतून सत्य बाहेर येईल, अजित पवारांची ग्वाही

अक्षय कुमारच्या चित्रपटाला नेटफ्लिक्सने नाकारलं