मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याला आता पुढील महिन्यात एक महिना होईल. नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट पाहायला मिळाली. पण गेल्या 20 दिवसांत पुन्हा परिस्थिती चिंताजनक बनली आहे. विशिष्ट वेळेसाठी लोकलसेवा सर्वांसाठी खुली करण्यात आल्याने रुग्ण वाढत असल्याचा दावा काही जण करीत आहेत. पण मुंबई महापालिकेचे म्हणणे मात्र वेगळेच आहे.
कोरोनाचे रुग्ण दोन हजारांवरून थेट सात हजारांवर गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (21 फेब्रुवारी) जनतेला संबोधित करताना चिंता व्यक्त केली. तसेच, कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे गर्दी वाढली आणि कोरोनाचा फैलाव देखील वाढला, असे सांगितले जाते. तथापि, कोरोनाचा जास्त फैलाव सार्वजनिक कार्यक्रम आणि विवाहसोहळ्यांमुळे याचा जास्त फैलाव झाला आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले. सध्या आढळणाऱ्या रुग्णांपैकी 82 टक्के रुग्ण लक्षणे नसलेले असून उर्वरित रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करावे लागते आहे. त्यातही यापैकी बहुतांश रुग्ण इमारतींमधील राहणारे आहेत. झोपडपट्ट्या किंवा चाळीमधील रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे काकाणी म्हणाले.
अशी परिस्थिती असताना देखील बेशिस्तपणाही मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमधून, लग्न समारंभामधून, चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणी नागरिक मास्क घालत नसल्याचे समोर आले आहे. कालपर्यंत (रविवार) विनामास्क फिरणाऱ्या 16 लाख 2 हजार 536 लोकांवर पालिकेने कारवाई केली. यांच्याकडून तब्बल 32 कोटी 41 लाख 14 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. केवळ रविवारीच 14 हजार 100 लोकांना 28.20 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रक्कमेतील 50-50 टक्के रक्कम पोलीस आणि पालिकेला दिली जाईल, असे काकाणी म्हणाले.
Comments
Loading…