लोकशाही न्यूज नेटवर्क
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी देशव्यापी देणग्या गोळा करण्याची मोहीम जानेवारीमध्ये सुरू करण्यात आली. मात्र, या देणग्यांवरून आता राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यावर राम मंदिर निधी समर्पण अभियान’चे कार्यकर्ते कर्नाटकात देणग्या गोळा करण्याचे काम करत आहे. मात्र, जे स्थानिक पैसे देत नाहीत, त्यांची नावे लिहून घेत आहेत. ते असे का करत आहे, याची मला कल्पना नाही. मात्र, नाझींनी जे जर्मनीमध्ये केले, तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केला.
RSS कडून नाझींची धोरणे!
जर्मनीमध्ये ज्यावेळी नाझी पक्ष उदयास आला. त्याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. राम मंदिरासाठी देणग्या देणारे आणि न देणारे यांच्या घरावर वेगवेगळ्या खुणा केल्या जात आहेत, असा दावा करत RSS कडून नाझींची धोरणे राबवली गेली, तर या देशाचे काय होईल, अशी विचारणा कुमारस्वामी यांनी केली आहे.
Comments
Loading…